दिया निलेश सामंत ९९,८० गुण मिळवून विद्यालयात प्रथम
वेंगुर्ले : प्रतिनिधी
एस्. एल्. देसाई विद्यालय पाट, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) फेब्रुवारी/मार्च- २०२६ चा निकाल एकूण ९५.५३ टक्के इतका लागला आहे. यामध्ये कु. दिया निलेश सामंत या विद्यार्थिनीने (४९९ गुण) ९९,८० गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
या विद्यालयातून एकूण ११२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी१०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयात द्वितीय क्रमांक कु.विश्वानी मंगेश सर्वेकर (४९१ गुण) ९८.२० टक्के गुण तर तृतीय क्रमांक कु. शुभंकर संदेश नाईक याने ४७७ गुण ९५.४० टक्के मिळविले आहेत. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. कु. दिया ही कुशेवाडा सरपंच निलेश सामंत यांची मुलगी आहे.













