. ओटवणे (प्रतिनिधी ) श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे या प्रशालेचा दहावीचा निकाल ९५. ८३ टक्के एवढा लागला असून एकूण २४ पैकी २३ विधार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. या प्रशालेतून मानसी महेंद्र नाईक या विधार्थीनीने ८६. २० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकवीला,गिरीश कृष्णा वर्णेकर ८५ टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला तर, सदिच्छा सदाशिव गावकर,सुरभी संदीप गावकर यांनी ८४ टक्के गुण मिळवीत संयुक्त तृतीय क्रमांक मिळवीला.विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, संस्थाध्यक्ष वामन कवीटकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा दिल्या.











