चिपळूणमधील युनायटेड इंग्लिश स्कूलची यशस्वी निकालाची परंपरा

विनय भावसार व स्वरांगी जोशी या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले ९८.८० टक्के गुण

चिपळूण (प्रतिनिधी):– शहरातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण या हायस्कूलने यशस्वी निकालाची परंपरा कायम राखली आहे. या विद्यालयाचा ९९.५९% निकाल लागला असून विशेष म्हणजे हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी ९८.८० इतके गुण मिळवून यश संपादन केले आहे. विनय पुनमचंद भावसार, स्वरांगी प्रमोद जोशी या दोन विद्यार्थ्यांनी समसमान टक्के मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण हायस्कूलने चिपळूण तालुक्यात दरवर्षीप्रमाणे आपला डंका वाजवला आहे. या हायस्कूलमधील दहावी परीक्षेसाठी २४७ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये केवळ एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. या हायस्कूलमधील ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून ३६ विद्यार्थ्यांनी, विशेष गुणवत्तामध्ये ७९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ८० तर द्वितीय श्रेणीत ४३, तृतीय श्रेणीत केवळ आठ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून एक विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरला आहे.

युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विनय पुनमचंद भावसार, स्वरांगी प्रमोद जोशी या दोन विद्यार्थ्यांनी ९८.८० टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. द्वितीय क्रमांक शुभ्रद संदीप काणेकर ९७.८० टक्के, तृतीय क्रमांक गौरांगी धनेश शेट्ये ९७.४० टक्के, रुद्र धन्वंतर वळजू ९७ .२० टक्के, शर्वरी विजय सावंत ९६ .२० टक्के, गंधर्व महेश गायकर ९५ .८० टक्के, कल्याणी मंदार ओक ९५.४० टक्के, गंधार सुशांत नाईक ९५.३० टक्के, सुश्रुत चेतन मालशे ९५.२० टक्के, ईश्वरी ओमप्रकाश राजे ९५ टक्के, संघर्ष संजय कदम ९४.६० टक्के, सक्षम शंकर माने ९४.६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळाने तसेच मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.