शिरगाव हायस्कूलचा ९६.९२ टक्के निकाल

मनस्वी मेस्त्री प्रथम

शिरगाव (प्रतिनिधी) :    मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत शिरगाव हायस्कूलने ९६.९२ टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली. प्रशालेतील मनस्वी मेस्त्री हिने ९३.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अथर्व खरात याने ९३ टक्के गुणांसह द्वितीय, तर तन्वी साटम हिने ९०.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.

या परीक्षेसाठी प्रशालेतून ६५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा एकूण निकाल ९६.९२ टक्के लागला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अरुण कर्ले, शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, अधीक्षक संदीप साटम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक एस. एन. अत्तार, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.