श्री देव ब्राह्मण देवस्थान, ओटवणे शेरवाळवाडी वार्षिक उत्सव १० मे रोजी

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे शेरवाळवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवस्थान चा वार्षिक उत्सव सालाबाद प्रमाणे रविवार १० मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न होत आहे. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असणाऱ्या या देवस्थाच्या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून जाणार आहे. सकाळी ९. ०० वा. श्री गणेश पूजन व अभिषेक, स. ११ वा. श्री सत्यनारायण महापूजा, दु. १२ वाजता महाआरती, दु. १ वाजता महाप्रसाद, सायं. ४.३० ते ६ वा. ग्रामस्थांचे भजन, सायं. ६ वाजता रंगमंचाचे उदघाटन,सायं. ६. ३० ते ९. ०० महिला व मुलांचे विविध गुण दर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम, आणि ठीक ९. ०० नाट्य रसिकांसाठी खास आकर्षण वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली यांचा ट्रिक सीन युक्त महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग अयोध्याधीश श्री राम हा होणार आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन शेष साक्षात्कार सेवा समिती आणि समस्थ शेरवाळवाडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.