मसुरे | झुंजार पेडणेकर :आंब्रड येथे श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ, श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सयुक्त विद्यमाने स्वर्गीय डॉ. सत्वशील राणे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचे उदघाटन डॉ. प्रशांत कोलते, डॉ. सर्वेश तायशेटे, मठाधीपती श्री गणेश घाडीगावकर यांनी व अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. या शिबीरामध्ये 91 रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले
प्रारंभी स्वर्गीय डॉ. सत्वशील राणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रा. दिनेश राणे यांनी डॉ. सत्वशील राणे यांच्या सेवाभावी वृत्ती बद्दल माहिती देऊन आठवणींना उजाळा दिला.मठाधिपती श्री गणेश घाडीगावकर म्हणाले, देव आपण पहिले नाहीत, मात्र आपणास जीवदान देणारे,, व्याधिमूक्त करणारे डॉक्टर हे माणूस नावाचे देवच आहेत. देवावर श्रद्धा व डॉक्टर करत असलेले उपचार यावर आपण विश्वास ठेवला तर निश्चितच आपण व्याधी मुक्त होऊ शकतो.
श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ खुप छान कार्यक्रम राबवित आहेत असे सांगत मंडळाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर कोलते यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधिले. आरोग्य शिबीर मध्ये तपासणी झाल्याने मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर सारखे आजार वेळीच समजतात व उपचार करणे सोपे होते. व रुग्ण लवकर बरा होतो.डॉ. कोलते यांनी श्री गांगेश्वर प्रासादिक मंडळ यांना धन्यवाद दिले व श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान श्री क्षेत्र खोटले यांची समिती श्री गणेश घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाने अश्या मोफत आरोग्य शिबिर करिता विनामूल्य औषधे पूरवितात या बद्दल समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.
या आरोग्य शिबिरा मध्ये शासकीय वैद्यकीय महा विदयालय येथील डॉक्टर्स यांनी रुग्ण तपासणी सेवा उत्तम प्रकारे केली, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल व उपकेंद्र आंब्रड येथील डॉक्टर्स व कर्मचारी यांनीही चांगले सह कार्य करून आरोग्य शिबीर यश स्वी केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रकाश परब, सचिव श्री भालचंद्र घाडीगावकर आणि खजिनदार श्री सचिन परब यांनी तसेच सर्व पदाधिकारी यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले.
सूत्र संचालन श्री संदीप परब यांनी केले तर
आभार प्रा दिनेश राणे यांनी मानले.










