मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कमिटी चे वेंगुर्ले पं. स. सभापती शंकर घारे यांनी केले स्वागत…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यात ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज कमिटी चे वेंगुर्ले पंचायत समितीमध्ये सभापती शंकर घारे यांनी स्वागत केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान वेंगुर्ले मध्ये आलेल्या या कमिटीमध्ये भोर पंचायत समिती गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी कृषी प्रवीण ढवळे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विनायक कोळी तसेच सागर कुडले यांचा समावेश आहे. ही कमिटी तालुकास्तरीय ग्रामपंचायतीनचे मूल्यमापन करणार आहे.

तरी या अभियानांमधील ग्रामपंचायतींनी मूल्यमापनासाठी त्या कमिटीला सहकार्य करावे असे आवाहन सभापती यांनी केले आहे.