आंबा व काजू प्रमाणे “कोकम”लाही नुकसान भरपाई मिळावी…

छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची शासनाकडे मागणी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
सतत चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकम पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा व काजू प्रमाणे कोकम पिकाला नुकसान भरपाई द्यावी. त्याच प्रमाणे फळपिक विम्यांमध्ये कोकम चा समावेश करावा. अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शामसुंदर राय यांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास दिलेल्या निवेदनात केली आहे.

कोकमला सध्या मोठी मागणी आहे. मात्र अवकाळी पावसामुळे कोकमचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कोकम पिकालाही नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोकण कृषी विदयापीठाने ही नेमके कोकम चे नुकसान होणाऱ्या कारणांचा अभ्यास करावा. शास्त्रज्ञांनी नेमके कोकम पिकाला बदलत्या हवामानातील कोणत्या घटकाची आवश्यकता आहे. हा ही अचुक अहवाल सादर करावा. गेले दोन ते तीन वर्षे सातत्याने कोकम पिकाचे ऐन काढणी पश्चात अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. याला शेतक-यांसाठी विमा (कवच) ची गरज असून न पेक्षा कोकम या फळपिकाला मोठी मागणी असून कोकम सरबत सिंधुदुर्गातील किंवा कोकमच्या बी पासून केमिकल असे अनेक उपयोगासाठी वाचा वापर होत आहे.

त्यामुळे चालू वर्षी आंब्याप्रमाणे कोकमची ही अवस्था असून मुळातच १०% टक्के कोकम पिक आलेले असून कुठेतरी या बदलल्या हवामानाचा फटका कोकमवर ही बसलेला दिसून येत आहे. त्या दहा टक्क्या मध्ये असणारे कोकम अचानक झालेल्या पावसामुळे व वादळी वा-यामुळे परिपक्व न जाता कच्चे ही खाली गळून पडलेले आहेत. त्याकरीता कोकमलाही आंब्याप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी. तसेच फळपिक विम्यामध्ये ही समाविष्ट करावे. असे कोकम उत्पादक शेतक-यांची संघटनेच्या नेतृत्वाखाली मागणी होत आहे. यावर शासनाने तात्काळ विचार करुन न्याय दयावा. असे या निवेदनात म्हटले आहे.