गावच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आमची जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम

 

महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय श्री नितेश जी राणे साहेब यांच्या माध्यमातून देवगड निपाणी मुख्य रस्ता ते हडपिड मधली वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे हे काम जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण रस्ते रुपये 20 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. मिलिंद साटम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. रस्त्याची स्थानिक ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी होती. ती पूर्ण झाल्यामुळे सर्वच ग्रामस्थांनी सन्माननीय पालकमंत्री महोदय यांचे आभार मानले आणि समाधान व्यक्त केले. यावेळी राजेंद्र शेटये, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, संतोष फाटक, हडपिड सरपंच संध्या राणे, उपसरपंच दाजी राणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश राणे, सुषमा कदम,रवींद्र कदम, अजित कदम, धनंजय कदम, किशोर कदम, सुरेंद्र चौकेकर, प्रकाश भोगले, विश्वनाथ राणे, उल्हास राणे, चंद्रकांत तावडे,साईराज कदम, विनायक कदम, इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यापूर्वी ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री नितेश जी राणे साहेब यांच्या सहकार्याने हडपीड गावामध्ये विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे यापुढील काळामध्ये गावच्या सर्वांगीण विकासाच्या जबाबदारी आमची आहे. असे प्रतिपादन जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांनी केले.