राजापूर (वार्ताहर): रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र आणि अखिल भारत हिंदू महासभेचे खंबीर नेते माननीय कै. विलासराव खानविलकर यांचा तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रम शुक्रवार, दि. १५ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हिंदू महासभा, रत्नागिरी शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रत्नागिरीतील ‘गुरुकृपा मंगल कार्यालय’ येथे दुपारी ११ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनेश भोगले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष दत्ता सणस आणि उपाध्यक्ष गोविंद तिवारी हे देखील या प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. याशिवाय कार्यक्रमाला हिंदू महासभेचे विविध पदाधिकारी, सावरकर व्याख्याते मिलिंद मुकुंद दातार, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश किनरे, अ. भा. हिंदू महासभेच्या महिला अध्यक्षा तिलोत्तमा खानविलकर आणि इतर सदस्यांनी या पुण्यस्मरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.













