आ.ज्ञानेश्वर म्हात्रें.
गौरव पोंक्षे माखजन:
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक ,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा प्रवास भत्ता द्या अशी मागणी कोकण विभागीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण संचालक पुणे यांचेकडे लेखी निवेदन देत केली आहे.
मे महिन्याच्या पगारात प्रवास भत्ता केव्हाच दिला जात नाही परंतु, राज्यातील बहुतांश प्राथमिक,माध्यमिक,उच्माध्यमिक शिक्षकांना बी.एल.ओ. व जनगणनेचे काम दिलेले आहे.या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या कामावेळी प्रवास करावाच लागतो.तथापी मे च्या पगार बिलात पूर्ण प्रवास भत्ता समाविष्ट करावा व तशी सूचना वेतन अधीक्षक,शिक्षणाधिकारी यांना करावी व तसे परिपत्रक बिर्गमित करावे अशी मागणी केली आहे.













