दोघेजण बचावले
वैभववाडी प्रतिनिधी
करुळ येथील धरणात बुडून तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. ही घटना आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी वैभववाडी पोलीस दाखल झाले आहेत. एकुण पाच जण धरणावर अंघोळीसाठी गेले होते. या घटनेची माहिती मिळताच करुळ येथील धरणावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.













