कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड…

पाचजणांना अटक…

प्रतिनिधी/रोहन कांबळे

कोल्हापूर : शहरातील जुना राजवाडा पोलीस स्टेशन’च्या हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई सायंकाळच्या सुमारास इस्कॉन मंदिराजवळ एका मोकळ्या भूखंडावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरी ओम नगरीतील इस्कॉन मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या प्लॉटिंगमध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जुना राजवाडा पोलिसांनी संध्याकाळी ४:१५ च्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला असता आरोपी
जुबेर अब्दुल पठाण (वय ३४, रा.राजोपाध्येनगर), प्रकाश वसंत हददरे (वय ३३, रा.आपटेनगर), ओमकार सोपान वीर (वय ३४, रा.शुक्रवार पेठ),गजानन सौदागर शिंदे (वय ४५, रा.राजोपाध्येनगर.)
अनिल अशोक ढवळे (वय ३३,रा.राजोपाध्येनगर) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून जुगाराचे साहित्य (पत्त्याचे कॅट) रोख रक्कम आणि सॅमसंग कंपनीचे महागडे मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संदीप शंकर घाटगे यांनी फिर्यादी दिली असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जुना राजवाडा पोलिस करत आहेत.