उन्हाळी गर्दीसाठी सावंतवाडी – पनवेल विशेष रेल्वे

सिंधुदुर्ग : उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सावंतवाडी रोड – पनवेल – सावंतवाडी रोड दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष रेल्वे १६ मे २०२६ ते ६ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक शनिवारी धावणार आहे.

शनिवारी धावणार विशेष सेवा

गाडी क्रमांक 01008 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष ही गाडी सावंतवाडी रोड येथून सकाळी ७.२० वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01007 पनवेल – सावंतवाडी रोड विशेष ही गाडी पनवेल येथून सायंकाळी ६.१० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

कोकणातील अनेक स्थानकांवर थांबा

या विशेष रेल्वेला कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेन या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. रेल्वेमध्ये एसी २ टियर, एसी ३ टियर, एसी ३ इकॉनॉमी, स्लीपर तसेच जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध असणार आहे.