▪️बिळवस हायस्कुल येथे माजी विध्यार्थी मेळावा उत्साहात
मसुरे | झुंजार पेडणेकर : माध्यमिक विद्यालय बिळवस येथे आजी-माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला विविध वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष व शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. सुर्यकांत जगन्नाथ पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री. जयवंत ठाकूर यांनी उपस्थितांचे स्वागत करून शाळा व माजी विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध विषद करुन माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी कायम नाते जपून ठेवल्याबद्दल आभार मानून यापूढे शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव यानी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, शिस्त, परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर जीवनात यश मिळवता येते असे प्रतिपादन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुर्यकांत जगन्नाथ पालव यांनी पुढील शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी स्पीकिंग वर्ग व कॉम्प्युटर बेसिक कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच विषयतज्ञांमार्फत विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत जगन्नाथ पालव, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष ॲड. अमित गणपत पालव, उपाध्यक्ष श्री. सदाशिव नारायण पालव, कोषाध्यक्ष श्री. सुबोध सुधाकर पालव, आंगणेवाडी प्रमुख ग्रामस्थ श्री. सिताराम शांताराम आंगणे,महान येथील उद्योजक श्री.सुधिर साळसकर, भोगलेवाडी येथील माजी विद्यार्थीं.श्री, संतोष धाकु भोगले, बिळवस ग्रामसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. दाजी विश्राम पालव, सरचिटणीस श्री. अशोक जनार्दन पालव, खजिनदार श्री विश्वनाथ दिगंबर पालव, सदस्य श्री. अशोक रामचंद्र पालव, चंद्रशेखर लवू पालव, प्रभाकर रघुनाथ पालव, शालेय समिती उपाध्यक्ष श्री गोविंद सोम सावंत , जयराम विष्णू पालव, बिळवस पोलिस पाटील सौ. राधिका पालव, श्री देवी सातेरी देवालय ट्रस्ट बिळवसचे अध्यक्ष आनंद गोपाळ पालव, हायस्कूलचे मुखाध्यापक श्री ठाकूर सर, कार्यक्रमासाठी माजी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
इ. १० वी मध्ये ८५% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याना २०,०००/- शिष्यवृत्ती देण्याचे शाळेचे माजी विद्यार्थी श्री. अरुण सुर्यकांत पालव (अमेरिका स्थित) यांनी जाहीर केले आहे.
यावेळी आजी माजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रथम मुख्याध्यापक व बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सूर्यकांत जगन्नाथ पालव यांचा बिळवस ग्राम सेवा मंडळा मार्फत जीवन गौरव पुरस्कार देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने आजी माजी विद्यार्थीं विद्यार्थिंनी व बिळवस पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिंदे सर यांनी केले तर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अॅड. श्री. अमित पालव यांनी आभार मानून शाळेच्या पुढील प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.













