सावंतवाडीत आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू 

२१ मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ

 विविध व्यवसायांसाठी विद्यार्थ्यांना संधी

सावंतवाडी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सावंतवाडी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक २१ मे २०२६ पासून होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

संस्थेमध्ये वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक मोटारगाडी, ड्रेस मेकिंग, कातारी, कोपा, आय.सी.टी.एस.एम., तारतंत्री तसेच लाकूड काम तंत्रज्ञ या विविध व्यवसायांसाठी प्रवेश उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक व अधिक माहिती https://admission.dvet.gov.in⁠ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

प्रवेशित पात्र प्रशिक्षणार्थींना शासनाच्या नियमानुसार दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेची सुविधा उपलब्ध असून पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरणे, अर्ज निश्चितीकरण करणे व व्यवसाय निवड प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी ८४३२६९५४९० व ९०५४८४५०८६ या क्रमांकांवर संपर्क साधावा.