मुंबई : महाराष्ट्रचे उद्योमंत्री ना.उदय सामंत परदेश दौऱ्यावर असुन त्यांचे स्वागताचे डिजिटल बोर्ड साऊथ कोरियामध्ये झळकल्याचे चित्र आज साऊथ कोरियात पाहायला मिळाले.आज LG सायन्स सेंटर मध्ये महाराष्ट्रच्या उद्योगमंत्री उदय सामंत यांचा स्वागताची तयारी साऊथ कोरियात करण्यात आली. आज हे सगळं भाग्य रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जनतेने चार वेळा निवडून दिले म्हणुन मी उद्योग मंत्री झालो, म्हणुन साऊथ कोरियाला आलो म्हणुन माझ्या मतदारसंघातील जनतेला साष्टांग दंडवत करत असल्याचे बोल उद्योगमंत्री सामंत यांनी काढले आहेत.
आज विविध उद्योग कंपनीशी गुंतवणूकीच्या कामासंदर्भात महाराष्ट्रचे उद्योगमंत्री साऊथ कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रचे उद्योगमंत्री बनन्याचे स्वप्न जे सत्यात उतरले त्यांचे भाग्य विधाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.यांनी मला उद्योग मंत्री केले नसते तर हा योग माझ्या नशिबी आला नसता असेही ते म्हणाले. ज्या लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले त्यांची आयुष्यभर रत्नागिरीकरांची सेवा करणे हेच उद्दिष्ट ठेऊन कार्यरत राहीन आणि कोकणी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत ना. सामंत यांनी व्यक्त केला आहे.












