देवगड ः प्रतिनिधी
मालवण येथील प्रकाश शेट्टीगार यांची देवगड बंदरात असलेल्या नाैकेवर खलाशी म्हणून कामाला आलेल्या दुर्गाप्पा लक्ष्माप्पा काेरवार(42) रा.मंडलेगीरी कुकनूर कर्नाटक याचा साेमवारी नाैकेवरून ीट येवून पडल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यु झाला.त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी 4.10 वा.सुमारास देवगड खाडीत मिळाला.
मालवण येथील प्रकाश दामाेदर शेट्टीगार यांच्या देवगड बंदरात असलेल्या नाैकेवर खलाशी म्हणून कामाला दुर्गाप्पा लक्ष्माप्पा काेरवार(42) रा.मंडलेगीरी कर्नाटक हा आपल्या सहकाèयांसमवेत साेमवारी सकाळी 10 वा आला हाेता.त्याला वरचेवर ीट येण्याची सवय हाेती.साेमवारी सायंकाळी 5 वा.सुमारास ताे नाैकेवरून चक्कर येवून पाण्यात पडला.त्याचा शाेध घेवून ताे मिळाला नाही.मंगळवारी सायंकाळी 4.10 वा.सुमारास त्याचा मृतदेह देवगड खाडीत पाण्यात मिळून आला.याबाबतची खबर त्याचा भाऊ गाैडाप्पा लक्ष्माप्पा काेरवार यांनी देवगड पाेलिस स्थानकात दिली असून पाेलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद केली आहे.तपास पाेलिस हवालदार राजन जाधव व आशिष कदम करीत आहेत.











