मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील बाणकोट ते देव्हारे मार्गावर वेसवी नाका परिसरातील बिर्याणी दुकानाचे समोर सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत चारचाकी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात बाणकोट सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदरर्भात
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वेसवी नाका येथील गरीब नवाज बिर्याणी दुकानासमोर, बाणकोट ते देव्हारेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर संबंधित चारचाकी वाहन उभे असल्याचे निदर्शनास आले. या वाहनामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका उद्भवू शकतो, अशा स्थितीत वाहन उभे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राहुल पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज माने (वय ३३, व्यवसाय नोकरी, नेमणूक बाणकोट सागरी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार केतन मोहन दरिपकर (वय ४९, रा. वेळास, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ नुसार २८ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.













