जि.प.सदस्य सुशील भायजे यांची कोकण रेल्वेकडे मागणी
गौरव पोंक्षे माखजन
दिवा येथून खास कोकणवसीय नागरिकांसाठी गणपती व अन्य सणासुदी च्या काळात चिपळूण साठी सुटणाऱ्या,दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचा विस्तार करून,ही ट्रेन दिवा ते संगमेश्वर रोड अशी चालवावी.अशी लक्षवेधी मागणी जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी केळी आहे.तसे लेखी मागणी पत्र सुशील भायजे यांनी मा.अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कोकण रेल्वे,बेलापूर भवन सी.बी.डी. यांना दिले आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे दिवा- चिपळूण या मेमू चा दिवा – संगमेश्वर असा विस्तार केल्यास कामथे,सावर्डे,आरवली,संगमेश्वर,देवरुख या भागातील गावातील मुंबईस्थित कोकणवासियांना मोठा फायदा होईल.गणपती व शिमगोत्सव काळात मुंबईहून गावाला येणाऱ्यांची संख्या या भागातून मोठी असते.मुंबई ते गाव असा प्रवास करण्यात मोठी कसरत करावी लागते.
शिवाय संगमेश्वर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने दिव्याला राहतात.अनेकांची घरे दिव्याला आहेत.दिवा संगमेश्वर अशी मेमू विस्ताराने धावल्यास येथील प्रवाशाना मोठा फायदा होऊ शकतो असे नमूद केले आहे.
तरी प्रवाशांचे हित लक्ष्यात घेऊन दिवा चिपळूण मेमू चा विस्तार दिवा -संगमेश्वर असा करावा अशी मागणी केली आहे.













