शंकर वैद्य साखरपा:
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गवरील आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ एस.टी.व एर्टिका याच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत पाच जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९-४० वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रल्हाद भिकाजीं शिंदे वय ५० राहणार भडकंबा हे आपल्या ताब्यातील एस.टी.(एम एच १४ बी टी २७५३) खडीकोळवण ते साखरपा अशी घेऊन जात असताना आंबा घाटातील दक्खन बस थांब्याजवळ आली असता समोरून येणारी एर्टिका एम एच ११डी झेड ०३२९ ही गाडी संतोष शिवाजी पवार वय ५० राहणार रामनगर सातारा हे रत्नागिरी ते सातारा असे जात असताना दक्खन जवळ आले असता समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात एस.टी.चालक प्रल्हाद भिकाजी शिंदे हे जखमी झाले तर एसटी प्रवाशी संजय तुकाराम शितप वय ५८, राहणार खाडिकोळवण एर्टिका चालक संतोष शिवाजी पवार वय ५०, शंभुराज शिवाजी पवार वय १३रा. रामनगर सातारा श्रीकांत लक्ष्मण मानपुरी वय २७ रा. भिवंडी – ठाणे हे जखमी झाले. जखमीना साखरपा प्राथमिक आरोग्यकेंद्रात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीना सुखरूप बाहेर काढले. व वाहतूक सुरळीत केली.


पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश सुतार, महिला हेड कॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल तानाजी पाटील, महिला कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पोलीस कार्यवाही सुरु आहे.













