संजीवनी डी.एम.एल.टी. नर्सिंग कॉलेज चिपळूणच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चिपळूण (प्रतिनिधी) : संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित, संजीवनी डी.एम.एल.टी. नर्सिंग कॉलेज, चिपळूण च्या २०२५-२०२६ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाविद्यालयाची कु. खुशी निर्मळ हिने ७७.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कु. तन्वी सर्दल हिने ७३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक आणि कु. नंदिनी गांजेकर हिने ७२.२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाघुळदे, प्राचार्य श्रीम. पूनम खानापूरकर व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, जिद्द व समर्पण हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण व व्यावहारिक ज्ञान देण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही असे यश मिळत राहील, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.