मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पळसंब ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सरपंच पदी बिनविरोध विजयी झालेले शिवसेना तालुका सरचिटणीस चंद्रकांत गोलतकर यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बांदिवडे येथे आयोजित कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख महेश राणे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, विभाग प्रमुख संतोष कोदे, जिल्हापरिषद सदस्या वर्षा सांबारी, पस सदस्य गणेश तोंडवळकर, माजी सरपंच तथा खरेदी विक्री संघ संचालक प्रफुल्ल प्रभू, सरपंच आशु मयेकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, मालवण उपनगराध्यक्षा दिपक पाटकर, जयप्रकाश परुळेकर,
शाखाप्रमुख बाळू माळकर, आनंद परब यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.













