वनगुळे शाळा नं१ चे उपक्रमशील शिक्षक विलास गोरे यांची केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती

लांजा (प्रतिनिधी) :वनगुळे शाळा नं१ चे उपक्रमशील शिक्षक विलास गोरे यांची कुवे केंद्राच्या केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
गेली अनेक वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विलास गोरे यांनी विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना आपला विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या कसा प्रगल्भ होईल त्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. वनगुळे शाळा नं१ मध्ये कार्यरत असताना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन यशस्वी केले आहे . यामध्ये नासा इस्रो उपक्रमात सातत्याने मुलांना निवडून आणले आहे. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक, क्रिडा यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत असतात. दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने धडपड सुरू असते. महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात.
विलास गोरे यांची नुकत्याच झालेल्या समुपदेशन कार्यक्रमात पदोन्नती मिळून कुवे केंद्र (तालुका लांजा) येथे केंद्र प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.