शाहीर काशिराम जाधव यांचा कार्यक्रम कोल्हापूर येथे संपन्न

अधिकारी वर्गासह शासनाच्या योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित

लांजा (प्रतिनिधी): आपल्या पहाडी आवाजाने योग्य शब्दात आवश्यक ती माहिती जनमानसात पोहोचवण्यासाठी प्रसिद्ध असलेले तालुक्यातील कोर्ले गावचे सुपुत्र शाहीर काशीराम जाधव यांचा कार्यक्रम नुकताच कोल्हापुर येथे पार पडला.
महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत राज्य भर छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व समाधान शिबिर शासकीय योजनांचा लाभ थेट सर्व सामान्यांच्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील कोर्ले गावचे सुप्रसीद्ध.शाहीर काशिराम जाधव यांनी लांजा तालुक्यातील कोरले .पुनस या गावी शिबिरामध्ये उपस्थित राहुन स्वागतगिता बरोबर अभियान पुरक गिते सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली होती. लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, नायब तहसिलदार गोसावी यांनी शाहीर जाधव यांना सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव केला होता.
शाहीर जाधव यांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नुकताच कार्यक्रम पार पडला. यावेळी हातकणंगले तालुक्याचे तहसिलदार सुशीलकुमार बेल्हे, नायब तहसिलदार चव्हाण यांनी लाटवडे. पेठवडगाव. हातकणंगले याठिकाणी शाहीरांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन उपस्थितांचा ऊस्ताह वाढविला ( ही महाराष्ट्राचीधरणी गाते मंगलमय गाणी, थोर शिवबाची करणी माझ्या राजाचा आदर्श गोजतोय आज जगामध्ये त्रिभुवनी!!धृ!!)यास्वरचीत गिताने सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक राव माने, महसुली विभाग. जिल्हा परिषद सर्व पधादिकारी वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी देखील शाहीर जाधव यांच्या कामाचे कौतुक केले.