पेडणे (प्रतिनिधी) : तुये सरपंच पदी अनिता आनंद साळगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांची अनिता साळगावकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तूये सरपंच सुलक्षा नाईक यांनी आपल्या पदाचा अलिखित करारानुसार राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे सरपंच निवडीसाठी पंचायत मंडळाची विशेष बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी अमिता आनंद साळगावकर यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सरपंच पदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी उपसरपंच मनोहर पेडणेकर, पंच निलेश कानोलकर, स्विटी नाईक आदी उपस्थित होते. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी पंचायत क्षेत्राच्या विकासाला आमदार आणि सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.












