मुख्य वीज वाहिनीतील बिघाड; दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
दापोली :- दापोली वीज महावितरण च्या मुख्य वीजवाहिनी मध्ये बिघाड झाल्यामुळे रात्रीपासून वीजप्रवाह खंडित झाला आहे. याबाबतीत कर्मचारी वीज वाहिनीवरील बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर करीत आहेत.
लवकरच वीज प्रवाह सुरू करण्यात येईल अशी माहिती दापोली वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.













