स्थानिकांकडून हटवून वाहतूक सुरळीत
न्हावेली- प्रतिनिधी : सावंतवाडी-मळेवाड मार्गावरील न्हावेली येथून जाणाऱ्या रस्त्यावर काल सायंकाळच्या सुमारास अचानक झाड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे या वर्दळीच्या मार्गावरील प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण झाला.
न्हावेली-चौकेकरवाडीतील विठ्ठल परब यांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ गावातील उपसरपंच आणि शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांच्या निदर्शनास आणली. माहिती मिळताच अक्षय पार्सेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.

व सहकारी अनिकेत धवण, राज धवण, पिंटो धाऊस्कर या तरुणांच्या मदतीने ते झाड कापून रस्ता मोकळा केला. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊस्कर, सुनील धाऊस्कर, संदीप धवण आदी ग्रामस्थही उपस्थित होते. भरपावसात या तरुणांनी केलेल्या या विधायक कामाबद्दल वाहनधारकांनी त्यांचे आभार मानले.
धोकादायक झाडे हटवण्याची मागणी प्रलंबित
दरम्यान याच रस्त्यावर इतरही अनेक धोकादायक झाडे असून ती हटवावी, अशी मागणी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी वैभव सगरे यांनी पाहणी करून झाडे तोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही हे काम झालेले नाही, असे अक्षय पार्सेकर यांनी सांगितले












