सावंतवाडी पत्रकार संघाची मागणी : प्रशासनाला निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येणार आहेत. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत तसेच रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार संतोष बांदेकर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार,सचिव मयुर चराठकर, राज्य पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,अण्णा केसरकर,डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,खजिनदार रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे,शैलेश मयेकर,संतोष सावंत,भुवन नाईक,नितेश देसाई,प्रसाद माधव,मंगल नाईक आदी उपस्थित होते.












