चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचे माजी उपसरपंच इर्शाद महामूद मुल्लाजी यांची शिवसेना अल्पसंख्याक चिपळूण तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. इर्शाद महामूद मुल्लाजी हे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांचे कट्टर समर्थक असून माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक निहार कोवळे, उपसभापती संदेश आयरे, माजी बांधकाम सभापती विनोद झगडे यांच्या माध्यमातून त्यांची चिपळूण तालुका अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख पदी निवड झाली आहे.
अल्पसंख्यांक समाजातील बांधवांना योग्य न्याय दिशा मार्गदर्शन करणार आहे तर शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देणार तर अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून विविध योजना, शैक्षणिक लाभ अशी विविध कामे करणार असल्याचे अभिवचन दिले आहे. येत्या काही दिवसात चिपळूण तालुक्यातील अल्पसंख्याक समाज बांधव यांना भेटून गाव भेट दोरा कार्यक्रम करणार आहे. त्यातून अल्पसंख्यांक समाजाचे विविध प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न करणार असून शासन दरबारी त्यांना न्याय कसा येता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. चिपळूण तालुका अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी इर्शाद मुल्लाजी यांची निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.












