चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील बामणोली गावचे सुपुत्र आणि सामाजिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व ॲड. संतोष (भाई) हरिश्चंद्र कुळे यांना महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिल यांच्या वतीने महाराष्ट्र समाज किर्ती पुरस्कार २०२५ देऊन गौरवण्यात आले. गेली अनेक वर्षे पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींमध्ये संतोष कुळे अग्रेसर आहेत.
तळागाळातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते पुढे असतात. समाज प्रगतीसाठी, समाजहितासाठी, समाज उन्नतीसाठी व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान आहे. त्यांचे एक कुशल व्यक्तिमत्व असून जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा या जोरावर समाजात किर्ती मिळवली आहे. म्हणूनच आपल्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन महात्मा गांधी पीपल्स अवॉर्ड कौन्सिलने हा महाराष्ट्र समाज किर्ती पुरस्कार २०२५ समर्पित करून त्यांचा गौरव केला आहे. आतापर्यंत त्यांना अनेक सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित पुरस्कार प्राप्त आले आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उकृष्ट जिल्हास्तरीय पत्रकार म्हणून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरी बद्दल यांना मिळालेल्या पुरस्कारासाठी सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












