ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट यांची कविता तिसरीच्या पुस्तकात समाविष्ट…

 

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबुराव शिरसाठ यांचे ‘ग्रंथ मंदिर’ ही कविता मराठी बालभारतीच्या जून २०२६ पासून नव्याने प्रकाशित होणाऱ्या तिसरीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.शिरसाट यांच्या ‘रोज नवा सूर्य’ या बालकविता संग्रहातील ही कविता असून ‘भातुकली प्रकाशन मुंबई’ या संस्थेने पुस्तक प्रकाशित केले आहे. शिरसाट यांची बाल साहित्याच्या विविध प्रकारामध्ये २७ पुस्तके प्रकाशित आहेत.
नुकत्याच त्यांच्या ‘चिमाची गोष्ट’ या बालकथा संग्रहाला अखिल भारतीय बालकुमार साहित्य सभेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी त्यांच्या मॉरल स्टोरीज आणि अनफॉर्च्युनेट ट्री या दोन इंग्रजी अनुवादित पुस्तकांची निवड शासनाच्या शिक्षण विभागाकडून इ. ६ वी ते इ.८ वी साठी पूरक वाचनासाठी निवड झालेली आहे.