वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ..
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख जेष्ठ शिवसैनिक तथा ज्येष्ठ पत्रकार संपादक वसंत उर्फ अण्णा केसरकर त्यांचा ८१ वा वाढदिवस त्यांच्या राहत्या घरी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तत्कालीन शिवसेनेचे आक्रमक नेतृत्व व स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख तसेच ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचा ८१ वा वाढदिवस नेहमीप्रमाणे तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांचे विशेष अभिष्टचिंतन करीत त्यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, माजी अध्यक्ष राजेश मोंडकर, विजय देसाई, दैनिक सकाळचे आवृत्तीप्रमुख शिवप्रसाद देसाई, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अनिल भिसे, कोकणसादचे मुख्य संपादक सागर चव्हाण, सहाय्यक संपादक कृष्णा ढोलम, पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गांवस, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, रुपेश हिराप, व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी पत्रकार प्रा. रुपेश पाटील, शैलेश मयेकर, आनंद धोंड, छायाचित्रकार जतिन भिसे, पत्रकार नागेश पाटील, दीपक गांवकर, लवू परब, अनिल कुडाळकर, स्वप्नील उपरकर, नयनेश गावडे, पराग मडकईकर, अनुजा कुडतरकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे, आ. दीपक भाई केसरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह अनेक मान्यवरांनी अण्णा केसरकर यांना फोनवरून शुभेच्छा देत त्यांचे विशेष अभिष्टचिंतन केले. पत्रकार क्षेत्रातील अनेक संपादक, उपसंपादक तसेच जिल्हाभरातील पत्रकारांनी देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.












