BREAKING: दापोलीत मोठा तणाव; हल्लेखोरांना पकडल्याशिवाय माघार नाही

Screenshot
नागरिकांची भूमिका; जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर 

दापोली: बकरी ईदच्या पूर्व संध्येला दापोली मधे हा तणाव निर्माण झाला आहे. जीवघेणी मारहाण करून दोन युवकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक हेल्वखोरांना अटक केल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका दापोली वासियानी घेतल्याने हरणे येथे तणाव निर्माण झाला आहे. रस्ता रोको करून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Screenshot

दरम्यान हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


BREAKING: हर्णे येथे दोन युवकांना बेदम मारहाण; आरोपींना अटक करण्यासाठी दापोलीत रास्ता रोको

दापोली / प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील हर्णे येथे हिंदू समाजातील दोन युवकांना झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेमुळे बुधवारी रात्री परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिन्मय गुरव व रघुवीर या दोन युवकांना ४० ते ५० जणांच्या समूहाने घेरून अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात काही युवक मंगळवारी धूम्रपान व मद्यपान करत असल्याचे पाहून एका युवकाने त्यांना विरोध केला होता. त्यानंतर या घटनेचा राग मनात धरून दुसऱ्या दिवशी बुधवारी मोठा समूह एकत्र येत चिन्मय गुरव व रघुवीर यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले असून, एका युवकाचे डोकं फ्रॅक्चर झालं आहे. दुसऱ्या युवकावरही उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच दापोलीतील शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने रात्री दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जमले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बुधवारी रात्री उशिरापर्यंत दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर हर्णे परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.