रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कसोप येथील दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात पाठीमागे बसलेली महिला गंभिर जखमी झाल्याची घटना गुरुवार 28 मे रोजी दुपारी 1.15 वा.सुमारास घडली. जखमी महिलेवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
विद्या संतोष लाखण (48,रा.मानखुर्द,मुंबई) असे अपघातातील जखमी महिलेचे नाव आहे. विद्या लाखण ही आपल्या पती आणि मुलांसह फिरण्यासाठी मुंबईहून 18 मे रोजी पेठकिल्ला येथील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. गुरुवारी दुपारी ती पतीसह दुचाकी (एमएच-08-बीएम-0047) वर पाठीमागे बसून रत्नागिरी ते कोळंबे येथील देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात होते. दुपारी 1.15 वा.सुमारास ते लक्ष्मीकेशवनगर कसोप येथे आले असता पतीचा दुचाकीवरील ताबा सूटल्यामुळे दुचाकी घसरुन अपघात झाला. यात विद्या लाखण यांच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद तेथील पोलिस चौकित करण्यात आली आहे.












