पक्ष कार्यालय हे जनसेवेचे केंद्र – पालकमंत्री नितेश राणे

लोरे येथे भाजपाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन

नामदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची आहे. पक्षाचे कार्यालय हे एक सेवा केंद्र आहे. कार्यालयाचे पावित्र्य प्रत्येकाने राखलं पाहिजे. नागरिकांनी या सेवा केंद्राचा पुरेपूर लाभ घ्यावा असे असे प्रतिपादन मत्स्य उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केले.

लोरे येथे भाजपाच्या विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जि. पं. सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, जि. प. सदस्य रिद्धी सुतार, उपसभापतीसाठी साची कोलते, देवानंद पालांडे, महेश संसारे, प्राची तावडे, मंगेश लोके, रितेश सुतार, विलास नावळे, प्रकाश गव्हाणकर, उद्योजक अनंत मांजलकर, संजय सावंत व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, कार्यालयातील नेत्यांचे फोटो हे आपले प्रेरणास्थान आहे. कार्यालयात नियोजन व शिस्त महत्वाची आहे. प्रत्येकाने कार्यालयात आले पाहिजे. या कार्यालयाचा वर्धापन दिन झाला पाहिजे. वर्धापन दिनी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सुविधांचा आढावा घेतला पाहिजे असे सांगितले. या कार्यालयाची सुरुवात करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नितेश राणे यांनी अभिनंदन केले. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात असे कार्यालय सुरू झाले पाहिजे. आणि जनतेला सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत असे आवाहन नितेश राणे यांनी केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचा लोरे जिल्हा परिषद च्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक अनंत मांजलकर यांचा नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रितेश सुतार यांनी मानले.