रत्नागिरी : शुक्रवारी पावस गोळप परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
येथील गोळप माने वाडी येथे डोंगर कोसळला. यात 8 घरातील लोकांना स्थलांतरीत व्हा असे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. काही मोटारसायकल मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्या आहेत.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही असे प्रशासनाने कळवले आहे.
तर मध्यरात्री बाजारपेठेत काही घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी आले होते. अडीवारे आणि परिसरातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे. अनेक वर्षांनंतर अडीवारे येथील प्रसिद्ध महाकाली देवीच्या आवारात पाणी भरले होते, अनेक मार्गावर सुद्धा पाणी साचलेले दिसून आले.
पावस मध्ये पण काही भागात नदीला लगत घरात पाणी भरले होते











