विलवडे येथे मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून गादी वाफे व प्लास्टिक मल्चिंग प्रात्यक्षिक संपन्न.

ओटवणे (प्रतिनिधी )           ग्रामीण कृषी कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विलवडे गावात काकडी पिकामध्ये उंच वाफे तयार करणे व इनऑरगॅनिक मल्चिंग या विषयावर प्रात्यक्षिक घेण्यात आले.या प्रात्यक्षिकामध्ये शेतामध्ये प्रथम शेणखत व सेंद्रिय खतांचा वापर करून उंच वाफे तयार करण्यात आले. त्यानंतर ठिबक सिंचन व्यवस्था बसविण्यात आली. पुढे सिल्व्हर-ब्लॅक मल्चिंग पेपर अंथरून लागवडीसाठी योग्य अंतरावर छिद्रे तयार करण्यात आली. तसेच मल्चिंगमुळे तण नियंत्रण, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे व पिकांची वाढ सुधारण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रात्यक्षिकाद्वारे मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जमिनीतील आर्द्रता दीर्घकाळ कशी टिकून राहते, तणांची वाढ कमी कशी होते तसेच पिकांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यास कशा प्रकारे मदत मिळते याची माहिती विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना देण्यात आली. तसेच ठिबक सिंचन व मल्चिंग यांचा एकत्रित वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत कशी होते याची माहिती देण्यात आली.

या प्रात्यक्षिकाद्वारे तण नियंत्रण, फळांची गुणवत्ता सुधारणा तसेच उत्पादनवाढ याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथील एस.जी.ओ., कृषी विस्तार अधिकारी तसेच परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय दळवी सर, डॉ. गिरीश उईके सर(AES) तसेच भाजीपाला शास्त्र विभागाचे डॉ. आशुतोष पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.प्रात्यक्षिकामध्ये कुमार प्रणव शेदुलकर, प्रसाद नाईकनवरे, वैभव अनारसे, अनुभव बिस्वाल, कुंजल निकम, मल्हार चव्हाण व श्रेयस बुरटे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.६ महिने हे विधार्थी विलवडे गावात राहून विविध पिकांच्या लागवडी त्याचे व्यवस्थापन आधुनिक पद्धतीने त्यात बदल घडवून शेतीच उत्पादन कस वाढवता येईल याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.