आमदार निलेश राणे यांनी कै. सन्मेष परब, कै. अक्षय राणे कुटुंबियांचे केले सांत्वन 

मासेमारी नौका समुद्रात बुडून दोघांचा झाला दुर्दैवी मृत्यू 

मालवण | प्रतिनिधी : मासेमारी नौका समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या कै. सन्मेष परब, कै. अक्षय राणे कुटुंबियांची आमदार निलेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

 

मालवण समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठिमागील खडकाळ परिसरात मासेमारीस गेलेली ‘सागरिका’ ही नौका लाटांच्या तडाक्यात सापडून मंगळवारी बुडाली. मालवण दांडी येथील मच्छिमार तथा भाजपा मालवण उपाध्यक्ष असलेले नौका मालक सन्मेश सुरेश परब आणि खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी सन्मेष परब, अक्षय राणे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शिवसेना, भाजपा पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.