मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वाढदिवसानिमित्त समृद्धी आंबेकरचा समान

गुहागर प्रतिनिधी:
मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम आलेल्या व विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या समृद्धी आंबेकर हिचा सन्मान केला.
समृद्धी सुरेश आंबेकर हिने
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे येथे शिक्षण घेत असताना
शताब्दी शिष्यवृत्ती प्राप्त,पूर्व माध्यमिक – इयत्ता आठवी शिष्यवृत्ती संपादन,MKCL Olympiad Movement परीक्षेत सुयश,शालेयस्तर , तालुकास्तरीय , जिल्हास्तरीय व विभागस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तसेच विभागस्तरीय PPT स्पर्धेत सुयश, गुहागर तालुकास्तरीय , रत्नागिरी जिल्हास्तरीय व विभागस्तरीय निबंध , वकृत्व , हस्ताक्षर , शुद्धलेखन , चित्रकला इ.स्पर्धेत सुयश,विभागस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक, राष्ट्रीयस्तर विज्ञान प्रदर्शनात ऑनलाईन सहभाग,चतुरंग गोडबोले सर्वोत्तम विद्यार्थी रत्नागिरी जिल्हास्तरीय पुरस्कार संपादन,
प्राध्यापक जहूर बोट सर्वोत्तम विद्यार्थी गुहागर तालुकास्तरीय पुरस्कार संपादन,शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ मधील माध्यमिक शालांत इयत्ता दहावी परीक्षेत ९९.२० % गुण संपादन करून गुहागर तालुक्यात प्रथम क्रमांकाचे सुयश असे विविध स्तरावर समृद्धी आंबेकर हिने यश मिळवले आहे.या तिच्या यशाची दखल मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी घेऊन तिचा आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून यथोचित सन्मान केला.यावेळी समृद्धीचे वडील शिक्षक सुरेश आंबेकर व मनसे सैनिक उपस्थित होते.