रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णवाहिकांनी केले मदतीचा हात पुढे
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील नामांकित परकार हॉस्पिटलमध्ये सोमवारी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. हॉस्पिटलच्या पहिला मजल्यावरिल डायलेसिस रुममध्ये असलेल्या एसीला शॉर्टसर्क्रिट झाल्यामुळे ही आग लागली. आग लागताच संपूर्ण परिसरात प्रचंड धूर पसरल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
परकार हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून आगीची सुरुवात झाली. डायलेसिस रुममधील एसीमध्ये अचानक शॉर्टसर्क्रिट झाले आणि त्याने पेट घेतला काही वेळातच या आगीमुळे हॉस्पिटलच्या या भागात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरले. दुर्घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकूण ५७ रुग्ण उपचार घेत होते. यामध्ये अत्यंत गंभीर अशा ७ रुग्णांचा समावेश होता. जे आय़सीयू मध्ये दाखल होते. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलत सर्वच्या सर्व ५७ रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये सुरक्षित हलवले. सुदैवाने या धावपळीत आणि आगीच्या घटनेत कोणत्याही रुग्णाला दुखापत किंवा इजा झालेली नाही. अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनांकडून देण्यात आली आहे.
आगीची माहिती मिळातच रत्नागिरी पालिकेचा अग्रिशम यंत्रणेला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्रिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत. युद्धपातळीवर प्रय़त्न केले. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले असून कुलिंग ऑपरेशन आणि पुढील आवश्यक कारवाई प्रशासनाकडून सुरु आहे.
दरम्यान परकार रुग्णालयात आग लागल्याचे समजताच रत्नागिरी शहरातील खासगी रुग्ण वाहिका धावून आल्या. त्यामध्ये श्री. शिरी शेठ कीर, शुभम कीर, तन्वीर जमादार, अरबाज जमादार, जुबेर जमादार, आशु तोडणकर, सज्जन लाड, सॅम मुकादम यांच्या एकूण 9 रुग्णवाहीका परकार हॉस्पिटल येथे लगेच आल्या आणि तिथून वेगवेगळ्या हॉस्पिटल ला विनाशुल्क रुग्ण पोहोचवून माणुसकीचे जिवंत उदाहरण समाजापुढे ठेवले
रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये..
या संपूर्ण घटनेनंतर परकार हॉस्पिटलचे डॉक्टर अलिमिया परकार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यांनी आगीचे कारण, रुग्णांना हलविण्यासाठी करण्यात आलेली धावपळ आणि त्यांच्या सुरक्षेबाबतची संपूर्ण अधिकृत माहिती माध्यमांना दिली. सर्व रुग्ण सुरक्षित असून नागरिकांनी व नातेवाईकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहनही यावेळी केले.














