गुहागर | प्रतिनिधी : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे , श्रीदेव गो कृ माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे दि 7ऑगस्ट 2O23 रोजी भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा व प्रख्यात लेखिका शिल्पा खेर मॅडम यांनी भेट दिली .ह्या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एम एस गंगावणे सर, मराठी विभाग प्रमुख श्री पी बी जाधव सर , जेष्ठ शिक्षिका श्रीम एम ए सावंत मॅडम, सौ एस एस ठाकूर मॅडम , श्रीम एस एस भोसले मॅडम व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी भाषा विभाग प्रमुख श्री पी बी जाधव सर यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले .सन्माननीय लेखिका शिल्पा खेर मॅडम यांचे गुलाबपुष्प देऊन पर्यवेक्षक श्री एम एस गंगावणे सर यांनी स्वागत केले . त्यांच्या सोबत उपस्थित असलेले त्यांचे सहकारी सुयोग पानकर यांचे स्वागत श्रीम एम ए सावंत मॅडम यांनी गुलाबपुष्प देऊन केले .
लेखिका शिल्पा खेर मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आत्मविश्वास म्हणजे काय ? तो कसा वाढवला पाहिजे यावर चर्चा केली . आजच्या विद्यार्थ्यांनी छंद जोपासताना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे व रोजनिशी लिहावी असे सांगितले . त्यांनी मेरी क्युरी, छत्रपती शिवाजी महाराज , संत तुकाराम यांच्या जीवन कार्याचा परिचय करुन दिला .विद्यार्थ्याशी संवाद साधताना प्रश्न विचारत विद्यार्थ्याना बोलत केल . विद्यार्थ्यानीही उत्तम प्रतिसाद दिला .
त्यांची यश म्हणजे काय ? , Just Belive* या पुस्तकांव्यतिरिक्त अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत .
असे विविध उपक्रम राबविण्यास शाळा समिती अध्यक्ष श्री.दिपकजी कनगुटकर साहेब यांचे कायम मार्गदर्शन लाभत असते .कार्यक्रमाची सांगता श्रीम.सावंत मॅम यांनी संस्था व शालेय प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करून केली.












