सोशल मिडीयावर झाली ओळख; पैसे मिळवून देतो सांगून अज्ञाताने 31 हजाराला रत्नागिरीकारला लावला चुना

crime online fraud

रत्नागिरी | प्रतिनिधी : सोशल मिडियाव्दारे फिर्यादीशी ओळख वाढवून टास्क पूर्ण केल्यावर पैसे मिळतात अशी बतावणी करत 30 हजार 720 रुपयांचा ऑनलाईन चुना लावला.ही घटना 20 मार्च ते 30 मार्च 2023 या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,अज्ञाताने फिर्यादीशी व्हॉटसअ‍ॅप आणि टेलीग्राम अ‍ॅपवरुन चॅट करुन ओळख निर्माण केली.त्यानंतर माझ्याकडे एक टास्क आहे तो पूर्ण केलातर पैसे मिळतात. परंतू, प्रत्येक टास्कसाठी प्रथम काही रक्कम भरावी लागते असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने त्याचे नाव,बँक खाते नंबर आयएफसी कोड अशी माहिती अज्ञात आरोपीला दिली.टास्क पूर्ण केल्यावर भरलेल्या रकमेसह रिवॉर्ड मिळेल असे सांगून सुरुवातीला फिर्यादीने भरलेल्या रकमेवर टास्क पूर्ण केल्यावर रिवॉर्ड व भरलेली रक्कम आरोपीने परत केली.मात्र त्यानंतर फिर्यादींनी टास्कसाठी भरलेली 30 हजार 720 रुपये रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली.याप्रकरणी संशयिताविरोधात भादंवी कायदा कलम 420,34 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.