आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात मसुरेच्या अस्मिता भोगलेची विशेष कामगिरी!

▪️फ्रान्स-इटलीमध्ये उजळवले देशाचे नाव!

▪️मुंबई इकॉनॉमिक्स क्लब तर्फे शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन

मसुरे | झुंजार पेडणेकर

मसुरे देऊळवाडा मठ येथील आणि सद्यस्थितीत मुंबई येथे वास्तव्यास असणाऱ्या अस्मिता प्रदीप भोगले ही
विद्यार्थिनी आपण शिकत असलेल्या एस एम शेट्टी कॉलेज पवई मुंबई या कॉलेज मधून फ्रान्स आणि इटलीच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात दोन्ही देशाचा यशस्वी दौरा केला. सुमारे दहा दिवसाच्या यशस्वी अभ्यास दौऱ्यानंतर अस्मिता भोगले ही पुन्हा भारतात आली असून तिच्या या यशस्वी अभ्यास दौऱ्यासाठी आणि अभिनंदन निवडीसाठी सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात अस्मिता भोगले हिने फ्रान्स आणि इटली मध्ये विशेष कामगिरी करून आपल्या कॉलेजचा आणि देशाचे नाव उज्वल केले आहे.अस्मिता भोगले ही एस एम शेट्टी कॉलेज पवई मुंबई येथे बीकॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.अस्मिता भोगले सोबत मुंबई येथील कॉलेजचे विद्यार्थी, काही शिक्षक आणि संशोधक सहभागी झाले होते.

इकॉनॉमिक्स क्लब मुंबईतर्फे नुकताच ट्रान्सफॉर्मेटिव्ह एज्युकेशनल एवस्पिरियन्स प्रोग्राम (टीईईपी) २०२६ अंतर्गत फ्रान्स आणि इटली येथे विद्याथ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि संशोधकांसाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. दहा दिवसांच्या या विशेष कार्यक्रमात विद्यापीठ अभ्यास, शैक्षणिक संवाद, संशोधन, अनुभव आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर देण्यात आला होता. या दौऱ्यात जागतिक शैक्षणिक संधींची आकांक्षा बाळगणाऱ्या तरुण विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

या कार्यक्रमात फ्रान्स आणि इटलीमधील पॅरिस, मासेंई, नाइस, कान्स, मिलान आणि पडोचा यांसह सातहून अधिक शहरांचा समावेश होता. अस्मिता भोगले आणि तिच्यासोबत असणाऱ्या सर्व सदस्यांनी सायन्सेस पो, पीएसएल विद्यापीठ, पॅरिस १ पॅथिऑन-सॉर्बोन विद्यापीठ, एक्स-मासेंई विद्यापीठ, पड़ोवा विद्यापीठातील मानसशास्त्र विभाग आणि मिलान विद्यापीठ अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांना भेट दिली. मुंबई आणि परदेशातील शिक्षणाबाबत माहिती घेऊन अभ्यास करण्यात आला.

पॅरिसमधील सायन्सेस पो येथे अस्मिता भोगले आणि सहभागी विद्याथ्यांनी संशोधक आणि शैक्षणिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत अर्थशास्त्र संशोधन, आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी आणि विद्यार्थी जीवनाविषयी माहिती घेतली. या भेटीदरम्यान राजकीय अध्ययन आणि नेतृत्व शिक्षण क्षेत्रातील संस्थेच्या जागतिक स्थानाचीही माहिती देण्यात आली. एक्स-मासेंई विद्यापीठात अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विभागाला भेट देत उपयोजित अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण विषयक संशोधन संधींवर चर्चा केली. इटलीमधील अभ्यासक्रमात आंतरशाखीय शिक्षण आणि मानसशास्त्रीय अध्ययनावर विशेष भर देण्यात आला. पहोवा विद्यापीठात विद्याच्यांनी मानवी हक्क, सामाजिक माध्यमे आणि किशोरवयीन वर्तन यांसारख्या विषयांवरील विशेष व्याख्यानांना उपस्थिती लावली तसेच प्राध्यापक, संशोधक आणि आंतरराष्ट्रीय संबंध विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अस्मिता भोगले आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी मिलान विद्यापीठाला भेट देऊन राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, उद्योजकता आणि माहिती विज्ञान या विषयांवरील व्याख्यानांना उपस्थिती लावली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे शैक्षणिक समन्वयन शोभना पाणीकर आणि डॉ. शशी पाणीकर यांनी केले. संशोधनाभिमुखता, शैक्षणिक व्यावसायिकता आणि सांस्कृतिक संवाद यांवर विशेष भर देत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अध्ययन दिनदर्शिका लिहिणे, संशोधन चर्चामध्ये सहभागी होणे आणि जागतिक संवाद कौशल्य विकसित करणे यासाठीही प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमाच्या जनसंपर्क आणि संवाद विभागाशी संबंधित विभा सिंग यांनी हा अनुभव विशेषतः उच्च शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संधीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण विद्यार्थिनींसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. वर्गातील शिक्षण आणि जागतिक शैक्षणिक संवाद यांची सांगड घालत या कार्यक्रमामुळे विद्याथ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि व्यापक बौद्धिक दृष्टीकोन विकसित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

अस्मिता भोगले ही मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भोगले यांची कन्या असून विविध क्षेत्रात तिने आजपर्यंत उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली आहे. परदेशातील या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याबाबत अस्मिता हिने एक प्रबंध ही सादर केला आहे. या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यात नाविन्यपूर्ण असं खूप काही शिकता आलं असून या अभ्यास दौऱ्याचा उपयोग आपल्या जीवनात आणि इतर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी होणार असल्याचे मत अस्मिता भोगले हिने यावेळी व्यक्त केले.