वेतोरे येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन…!

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत वेतोरे गावामध्ये कृषीदूत म्हणून आलेल्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय वेतोरे येथे कृषी माहीती केंद्र सुरू केले आहे. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
उद्घाटन कार्यक्रमास वेतोरे गावच्या उपसरपंच सौ. संतोषी गावडे, ग्रामपंचायत सदस्य सौ साक्षी राउळ, श्री. विक्रांत सावंत, कृषीसहाय्यक सौ. श्रेया चव्हाण, कृषीभुषण पुरस्कार प्राप्त श्री. शिवराम गोगटे, श्री. धोंडी पास्ते (तलाठी), महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॅ. विजयकुमार पाळसांडे , सोसायटी सेक्रीटरी श्री. नारायण नाईक व शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच सौ. संतोषी गावडे यांनी श्रीफळ वाढवून आणि फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचे कु. प्रणय बनगडे याने सूत्रसंचालन केले. श्री. धोंडी पास्ते (तलाठी) यांनी इ-पीक पाहणीविषयी जनजागृती केली. व कृषीसहाय्यकांनी विविध शेतीसंबंधी योजनांची शेतक-यांना सखोल माहीती दिली आणि कु. वाल्मिक शिंदे याने काजूवरील कीड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. नरेंद्र घुले, तेजस झोळ, आबाजी कदम, भूषण तायडे, प्रदीप चौधरी, वाल्मिक शिंदे, प्रणय बनगडे यांनी विशेष मेहनत घेतली.