जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिन’ च्या निमित्ताने शुक्रवारी ५ जून रोजी वेंगुर्ला पंचायत समिती मार्फत पंचायत समिती कार्यालय नजीक सभापती शंकर घारे यांच्या हस्ते तर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.
वेंगुर्ले पंचायत समिती मार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम वेळी पं. स. उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, म्हापण पं. स. सदस्य आप्पी फणसेकर, कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण, तसेच संदिप मांजरेकर, सखाराम सावत, सुप्रिया कोरगांवकर, गुरुनाथ धुरी, महादेव गावडे, सुजित फडतरे, प्रफुल्लकुमार शिंदे, महेश नाईक, आदी अधिकारी व पं. स. कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कदंब, करंज, बदाम आदी झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी कातकरी समाजातील मुलासमवेतही वृक्ष लागवड केली.












