वेंगुर्ला येथे ६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

कै. सौ. महानंदा उर्फ सुनंदा शामप्रसाद गुरव यांच्या प्रथम स्मृती दिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले येथे ६ सप्टेंबर रोजी गुरव कुटुंबीय व मित्रपरिवार पुरस्कृत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वेंगुर्ले शहरातील पू. प्रा. शाळा वेंगुर्ला नंबर १, वेंगुर्ला (श्री रामेश्वर मंदिरासमोर) येथे रविवार ६ सप्टेंबर रोजी

सकाळी ९ ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात रक्तदान करण्यासाठी व अधिक माहितीसाठी अमोल पडवळ: ९८९०९८८३८८, सचिन परुळकर ९४२१२३८०५३, दिनेश शिरसाट: ९८९०८०४८९४, नाना राऊळ ९४०४१६९५५५, प्रसाद गुरव ९३५६४६६८०३, मयुरेश गुरव ९९७०७५८२०७ किंवा मंगेश गुरव: ७५०७५५५१९१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.