दापोली: किरकोळ कारणावरून ७५ वर्षीय वृद्धेसह नातीला लाकडी दांडक्याने मारहाण; हर्णे येथील घटना

दापोली (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठ येथे किरकोळ कारणावरून एका 75 वर्षीय वृद्ध महिलेस व तिच्या नातवाला लाकडी दांडक्याने मारहाण. केल्याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12 वाजन्याचे सुमारास जयश्री रमेश भंडारे (वय 75, रा. हर्णे बाजारपेठ, ता. दापोली) व त्यांची नात घरात बसलेले असताना सुरेश भंडारे तेथे आला व त्याने हातातील लाकडी दांडक्याने वृद्ध जयश्री भंडारे यांना मारहाण केली. त्यानंतर आजीला वाचविण्यासाठी आलेल्या नातीलाही सुरेश याने दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या मारहाणीत जयश्री भंडारे यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून रक्तस्त्राव झाला असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुरेश भंडारे याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही जयश्री भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात संशयित सुरेश भंडारे याचे विरोधात बीएनएस कलम 118(2), 332, 351(2) व 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड्कॉनस्टेबल सडकर करत आहेत.