ओटवणे (प्रतिनिधी )
ओटवणे देऊळवाडी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवीन स्थानापन्न पुतळ्याला आज राज्याभिषेक दिनानिमित्त विधिवत प्रतिष्ठापना करत दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शिवप्रेमिनी उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे सकाळपासूनच वातावरण भक्तिमय आणि शिवमय झालं होत.काल या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला होता.दरम्यान आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा युवानेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक यांची हजेरी लावली होती.यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना विशालजी परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा धग धगता इतिहास मांडला त्याच बरोबर आजच्या राज्याभिषेकाच्या दिनी त्यावेळी काय घडल होत याचाही इतिहास मांडला , त्यांनी आपले विचार मांडताना आजच्या युवा पिढीने काय केल पाहिजे कोणते गुण अंगीकारले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. याच बरोबर या पुतळ्या शेजारी मंडप उभा करणार असल्याचेही आश्वासन दिले. यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित ऍडव्होकेट अनिल निरवडेकर यांनीही आपले विचार मांडलेत या कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे शाळा नंबर १ चे माजी मुख्याध्यापक मुख्याध्यापक होडावडेकर सर, चेतन गावकर आदिसह मोठया संख्येने देऊळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळ पासून हा परिसर शिवाजी महाराजांच्या जय घोषाने दणाणून गेला होता. सकाळी भव्य शिवरॅली ने वातावरण शिवमय झाले होते.आज राजा शिवछत्रपतींचा राज्या भिषेक दिन असल्याने शेकडो शिवप्रेमी महाराजांच्या या सिंहासना धिश मूर्ती चरणी नतमस्तक झाले होते.













