लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील रुण गावातील मारुती शंकर अपकारे यांची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) शेतकरी सल्लागार समितीवर निवड झाली आहे. सन २०२६ ते २०२८ अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीवर मारुती अपकारे यांची ही निवड झाली आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी या निवडीचे पत्र मारुती अपकारे यांना दिले आहे. या निवडीबद्दल मारुती अपकारे यांच्यावर रुण गावासह साटवली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे













